माझ्या कविता
@ जीवन पचते आहे खरे @
सूर होते जुने
मग तार का छेडले । असे नाविन्याचे वारे मज जीवनी का धाडले । जीवन पचते आहे खरे ॥ विश्वास दिला प्रेमाचा
ध्यास होता मज जीवाचा
माझ्या शरीरात अचानक
हे पित्त का वाढले ।
जीवन पचते आहे खरे ॥
ना मी केला स्वार्थ
तरी माझ्या पदरी हा अनर्थ ।
तिच्या मायेच्या पदरातुन
का ओढून बाहेर काढले ।
जीवन पचते आहे खरे ॥
आस घेवुन माऊली
फक्त निरोपाची ती वाली
बाप धरता हाताला
नयनांनी अश्रू हे सांडले ।
जीवन पचते आहे खरे ॥
-- शितल भालेकर
Comments
Post a Comment